धन्यवाद बाबा
धन्यवाद बाबा तुमच्या शिकवनीचा
बाबा, तुमची ऐकमेव ईच्छा मी शिकाव. खुप शिकाव. तुमच्या स्टेटस ला शोभेल असे गुन मिळवावे. डॉक्टर, ईंजिनिअर व्हावे. त्यासाठी काहीही करण्याची तुमची तंयारी होती. पहीजे तितक्या गाईंडस्, ट्यूशन्स, क्लासेस कशाचीही तुम्ही कमी केली नाही. कारण तुमची ईच्छाशक्ति जीतकी दांडगी हाच तुम्ही मला दिलेल्या स्नेहा चा वाटा आहे. तुम्ही खरच चुकीचा विचार कधीच केला नाही. आणी समाजात माझी मान कशी ऊंचावेल हाच नेहमी वीचार केला.
बैलाला घान्याला जशे जुंमतात तसा मी ईयत्ता दहावी व बारावीच़्या अभ्यासाला जुंपलो. आपले जीव ओतुन जस जमेल तसा अभ्यास केला त्यात जे काही मागीतले ते तुम्ही मला दीले. कधीच कुठे कमीपना जानवुन दिला नाही. कधी हेही नाही जानवले की तुम्ही कीती मेहनत करुन मला शीकवले. आजही ते दिवस आठवले की वाटते मी तुमच्या कामाची जराही बरोबरी करु शकनार नाही.
तुम्ही घरी आले की धकवा न जानवता, प्रश्नाची तुमची सरबत्ती सुरु व्हायची "शाळा कधी सुटली? " "शाळेत काय झाले? " "ट्युंशन मध्ये काय झाले? " "अभ्यास काय केला? " या प्रश्नाची ऊत्तर तंयार ठेवायला मी तुम्ही घरी येई पर्यन्त तंयारी करुन राहायचो. जर नाही जमले तर आई ची बाजु घ्यायचो. जर कहीच नाही झाले तर केवीलवाऩ्या नजरेन आई कडे बघायचो. दहावीला मला छान गुन मीळाले. तुमच्या आकांशांना नवे धुमारे फुटले. तुमच्या स्वनांना नवी चालना मीळाली. पुढील वाटचाली करीता तुम्ही परत संज्ज झाले. तुमच्या नजरेत परत मी कुठे तरी मोठ बनाव असे वाटु लागले. तेव्हा कळले की लढाई ईथे संम्पली नाही. पुढे परत मेहनत वाढवावी लागेल. पुढे काय करावे परत विचार सुरु झाले. ऐडमिशन कुठे घ्यायची. ईजिनियरीग साठी काय शीकावे या रेस मध्ये मला ऊतरवले आणी परत मी आपली शक्ति प्रान पनाला लाऊन ईजिनियरीग साठी धाऊ लागलो.
कसे बसे ईयत्ता बारावी झाले पन काही कारनास्तव मीआपले पुर्नत्व सीध्द करु शाकलो नाही ज्यामुळे मला डिप्लोमा करावा लागला परत वळन चुकले पन तुम्ही मला आधार दिला माझी झेप कुठे आहे तो समजुन मला न रागावता मला परत पुढे लढऩ्यास तंयार केले. तुमच्या आधाराने मी माझे ईजिनियरीग चे स्वप्न मात्र पूर्ण करु शकलो. तुमचा व आईचा आधार नसता तर मी तुमचे व माझे स्वप्न पुर्ण करुच नसतो शकलो.
सगळे काही झाले, नौकरी सुध्दा लागली. तुमच्या आकांशांना नवे स्वंप्न फुटले. अपेक्षाचा डोंगर वाढला. वाटले की नौकरी मीळाली की संम्पले. पन नाही, नौकरी टिकवायसाठी परत पुढे शीकावे लागले. नौकरी सुरु असतांना एम. टेक. केल, तेही अपुरे पडले, पुढे डॉंक्टरेट करावे लागवे. नौकरी टिकवायसाठी तेही केले. परिवारातील मंडळीना खुप आनंद झाला. सरवे काही सुरळीत झाले. पन ऐकच गोष्ट नाही शीकलो ती म्हनजे "जी-हुजुरी". फार चुकीचा व्यवहार म्हनजे, मेहनत न करता "जी-हुजुरी" करने. धन्यं भाग माझे की ही शिकवन मला मीळाली नाही. परन्तु, असे नीर्दशनास आले की, चे "जी-हुजूरी" करतात त्याची पदोन्नति होते तसेच त्याच्या पगारात बढ़ोतरी सुध्दा होते. अश्या नौकरपेशी व्यक्ति मध्ये पदोन्नति मीळवण्याचे गुन असो किंवा नसो पन त्यांच्या चापलूसी व चमचेगीरी तसेच लावालावी या गुना मुळे त्यांना तातपुरती समाधान करनारी बढ़ोतरी मीळते. तसे बघीतले तर अश्या व्यक्ति चा दावा जास्त दिवस नसतो. तसेच असे व्यक्ति फार कार टीकुन राहु शकत नाही. बॉस किंवा राजा बदलला की नवीन बॉस ला कसे खुश करावे लागवे याचे राजकारन असे व्यक्ति सुरु करतात. अश्या वाईट सवई पासुन बाबा तुम्ही मला दुर ठेवले तसेच स्वाभिमानानी स्वबळाकर जगायला शिकवले यासाठी मी तुमचा सदैव रुनी राहील. अश्या व्यवहारात स्वताला टीकवुन टेवण्याची तसेच आपल्या करतुत्वावर स्वताला पुढे लढऩ्यची जी शिकवन तुम्ही दिली यासठी मी आभारी आहो.
आज कोरोना काळात कळले की, स्वबळावर मीळालेली मेहनतीची कमाई कशी टीकवुन ठेवावी लागते तसेच व्यवहारात टिकुन रहायसाठी ज्या स्तरावर लढा द्यावा लागेल तो द्यायचाच, पुढील व्यक्ति कीतीही बलशाली असो जर आपन चुक नसेल तर नक्कीच जींकु आणी तो लढा मी तुमच्या सस्काराच्या आधारे देत राहनार व स्वताला नेहमी "जी-हुजूरी" पासुन दूर ठेवनार.
चार ओळी या कल्पकतेवर
"शेर हमेशा अपनी ताकत से राजा बनता है
क्यो के जगलं मे राजनीति नही चलती ओर नाही चुनाव होते हैं"
तुमच्या सस्काराच्या आधारे मी असेच पुढील तुमच्या आकांशांना, स्वप्नानांना पूर्ण करत राहनार व लढत राहनार.
धन्यवाद बाबा तुमच्या शिकवनीचा.

Very well said
ReplyDelete