कोरोना वर्ष T-20 - T-21

कोरोना वर्ष T-20 - T-21 


संबंध मानवजातीला २०२१ हे वर्ष सूख,समाधानाचं जाओ...

              खरं तर हा लेख लिहिताना माझा हात थरथरत होता.
कारण या २०२० वर्षाने माझे मिञ, मैत्रीणी नातेवाइकांना मी गमावल आणि दुःख या गोष्टीचं आहॆ कि त्यांच मला अंतिम दर्शन सुद्धा बघायला मिळालं नाही.

फार कठिन वेळ होती
ती परत कधी ना यावी
तसेच गरीबांनवर असली पायपीट करण्याची वेळ येऊ नये 
गेलेली नौकरी परत मीळाली पाहीजे 
तसेच कापल्या गेलेला पगार परत मीळावा
याच आशेचा सहारा घेऊन नवीन वर्षा आज आपन पदारपन करत असतांना

आपण सर्वच जण कोरोनाच्या दहशतीत जगतोय. दिवसागणिक वाढत जाणाऱ्या आकडेवारीनं काळजात धस्स होतंय. अनेकांनी आपली जीवलग माणसं गमावली. अनेकांचे जीवलग कोरोनाशी झुंज देत आहेत.

कोरोनाने आम्हाला शिकवले की,
 आपल्या गरजा खूप कमी असतात. अशा अनेक गोष्टी आहेत की, त्या नसल्या तरीही आपण त्याशिवाय जगू शकतो. अनावश्यक गरजा ओळखायला शिका आणि त्यांच्या सवयी टाळा.
कितीही बलाढ्य देश असू देत. आधुनिक शस्त्रास्त्रे असू देत. त्यांच्याकडे मिझाईल्स असलेले, सुपरपॉवर असलेले, शक्तीमान देशांना कोरोनाने नतमस्तक व्हायला भाग पाडले आहे. एका डोळयालाही न दिसणाऱ्या विषाणूने सर्व जगाला आज एका समान पातळीवर आणून उभे केले आहे. आज लोकांना गरज आहे ती औषंधाची, डॉक्टर्सची, वैज्ञानिकांची. लोकांना आधुनिक हत्यारे नकोत. कोरोनाने शिकवले- कुणाचे काम हीन लेखू नका. प्रत्येकाला मान द्या, आदर करा. आज सफाई कामगार खूप मोठे काम करित आहेत. पोलीस दल लोकांना शिस्त लावण्याचे काम करत आहेत. डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी अहोरात्र कोरोनाबरोबर लढा देत आहेत. या सर्वांचा आदर करायला कोरोनाने शिकवले आहे.

कोरोनाने आम्हाला शिकवले. आपणच आपले संरक्षण केले पाहिजे. तुम्ही सरकारी नियमांचे पालन करा, घरात राहा, सोशल डिस्टन्सचे पालन करा आणि सुरक्षित राहा. आपल्या चुकांचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार आणि आपल्याबरोबर समाजाला पण भोगावे लागणार. दुसऱ्याने केलेल्या चुका तुम्ही परत करू नका. रोज बातम्या बघतो त्यातून धडा घ्या. त्या चुकांचे परिणाम गंभीर व भयानक असतात.
सरकारी दवाखाना जगायला हवा...
कठीण समय येता सरकारी दवाखानाच कामास येतो, हेही जनतेने यावेळी पुरेपूर अनुभवले. पण या गर्दीने आपली लेचीपेची आरोग्यव्यवस्था उघडी पाडली. दवाखाने कमी, डॉक्टर कमी, परिचारिका वगैरेंचा तर डॉक्टरांपेक्षा अधिक तुटवडा. औषधे  आणि सामुग्री कमी आणि कमअस्सल. इंजेक्शन आहेत तर गोळ्या नाहीत, गोळ्या आहेत तर इंजेक्शन नाहीत. धर्म नावाची अफूची गोळी मात्र गल्लोगल्ली उपलब्ध. ग्रामीण भाग बरा म्हणावे अशी शहरांची अवस्था. ही यंत्रणा सुदृढ करायला हवी.
खूप मोठमोठ्या कंपन्यानी आपल्या लोकांना घरात बसून काम करण्यास सांगितले आणि लाखो लोक आज घरात बसून काम करत आहेत. त्या कंपन्याचे उत्पादन सुरू आहे. आपल्याला कोरोनाने हे पण शिकवले घरातून आपण काम करू शकतो. त्यासाठी ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. रोज ट्रॅफिक जॅममध्ये अडकण्याची गरज नाही. उत्पादनक्षमतेवर त्याचा परिणाम होत नाही. या काळात नवीननवीन पध्दती कंपन्या शोधून काढत आहे.
वाईटातील चांगले, या साऱ्या वाईटात काही चांगलेही आहे.  लसीकरणात भारताने भलतीच झेप घेतलेली आहे. लस आली की ती सर्वांपर्यंत पोहोचवणारी यंत्रणा आपल्याकडे जणू सज्ज आहेत.
आज वर्षाचे शेवटचा दिवस..
 खूप काही गमावल पण त्यापेक्षा अजून कमावल, अगदी ह्रदयाजवळची माणसे दूर झाली,पन तितकीची जवळ आली,खूप काही सोसल, खूपकाही अनुभवलं, केलेल्या संघर्षातून जीवन कस जगायच हे शिकल..
धन्यवाद, तुम्ही देतअसलेल्या साथीबद्दल.. 
असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो.. 
चुकून जर मन दुखवल असेल तर मोठ्या मनाने माफ करा.. 
अन येणारे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीने, भरभराठीचे जाओ..

T-20 - T-21
आपणास नव वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...

Comments

Post a Comment

Science and Technology

नौकरी मे संतुष्टी

ज्ञान और अनुभव के अनुसार अपने पेशे को चुनना चाहिये

सफलता पाने के लिये हमेशा सीधी राह नहीं होती 💯